बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

मेळावर आली कारवी!


पियुष सक्सेरिया, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी

लहानपणी बहरलेल्या कारवीतून वाट काढत एक टेकडी चढत गेल्याचं मला अंधुकस आठवतं. पण कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी कारवीच्या फुलांनी आच्छादलेला एखादा डोंगर माझ्या डोळ्यापुढे उभा राहत नाही कि तिचं एखाद फुल अलगद उचलून मी आपल्या वहीत जपून ठेवल्याचंही मला आठवत नाही. कारवीची झालर पांघरलेला एखादा डोंगर पाहणे ही आयुष्यभरासाठी एक अविस्मरणीय आठवण ठरू शकली असती कदाचित. लहानपणी अज्ञानामुळे ती संधी गेली. पण आता पुन्हा एकदा ती मला खुणावत होती आणि यावेळीही तोच मूर्खपणा करणे परवडण्यासारखे नव्हते. मी लगेच पश्चिम घाटातलं पाचगणी गाठलं. येथे या भागातील पहिल्याच कारवी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कारवी या विलक्षण वनस्पतीच्या बहरण्याचा सोहळा साजरा करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो.  याची देही याची डोळा मलाही तो सोहळा अनुभवयाचा होता. 
 एखाद्या खुरट्या वृक्षासारखी दिसणारी कारवी (Strobilanthes callosa) ही Strobilanthes या वनस्पतीप्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. पश्चिम घाटाच्या डोंगरउतारांवरील बरड मातीत जिथं अगदी मोजक्या वनस्पती कशाबशा उगवतात तेथे कारवी भरभरून येते. पावसाळ्यात तिला पालवी फुटते, पुढे या पालवीचे हिरव्यागार मऊ व खरबरीत पानांमध्ये रुपांतर होते. हिवाळ्यात ही पानं गळायला लागतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाड पूर्णपणे वाळल्यासारखं दिसू लागतं. हे चक्र सात वर्ष असंच चालतं. आठव्या वर्षी कारवी आधी कळ्यांनी आणि मग निळसर जांभळ्या फुलांनी बहरून जाते. याबरोबरच हे निरस वाटणारे डोंगरउतार या सुंदर जांभळाईने जणू प्रज्वलित होऊन जातात. संपूर्ण कारवीतून मधमाश्या गुणगुणू लागतात. त्या नुसते मधच गोळा करत नाहीत तर तिचे परागकण वाहण्याचे कामही करतात. कारवीच्या अशा एकत्रित बहरण्यालामुळेच कदाचित स्थानिक लोक या घटनेला कारवी “मेळावर” आली असं म्हणतात. पुढे तीन-चार महिन्यात कारवीला फळे येणे, पिकणे आणि जमिनीवर पडून वाळणे या सर्व गोष्टी नैसर्गिकरीत्या घडून येतात आणि जवळपास जानेवारीच्या सुमारास सर्वच्या सर्व कारवीची झाडे मरून जातात.
कारवीच्या बीज प्रसाराची पद्धतही विलक्षणच आहे. वनस्पती शास्त्रज्ञ अपर्णा वाटवे यांनी ती समजावून सांगितली, कारवीच्या बियांचा प्रसार अद्रतास्फोटातून होतो. कारवीची वाळलेली फळे बराच काळ ओलसर वातावरणात राहिल्यास ती फुटून त्यातून बिया जोरात बाहेर फेकल्या जातात. या बिया आपल्या मूळ झाडापासून ५ मीटर दूर पर्यंत जाऊन पडतात आणि पावसाळ्यात उगवतात. हा घटनाक्रम Strobilanthes या वनस्पतीप्रकारचं वैशिष्ट्य आहे. भारतात या प्रकारातल्या ५६ वनस्पती आढळून येतात.
याच वर्षी, याप्रकारातील उत्तर पश्चिम घाटाच्या पठारांवर येणारी आणखी एक वनस्पती, टोपली कारवीही फुलली आहे. उलट्या ठेवलेल्या टोपलीसारखी दिसते म्हणून तिला मराठीत हे नाव पडलं. टोपली कारवीच्या बीजापासून फुलं येण्यापर्यंतच्या कालक्रमाबद्दल तज्ञांची वेगवेगळी मते आहेत. अंबोलीचे निसर्गप्रेमी महादेव भिसे याबद्दल सांगतांना म्हणाले कि, “स्थानिक लोक टोपली कारवीला अकरा म्हणतात कारण ११ हा तिला फुलोरा येण्याचा कालावधी दर्शवतो. हिलाच बकरा असंही म्हटलं जात कारण तिचं झाड खाली डोकं घालून चरत असलेल्या बकरीसारख दिसतं.”
याच वर्षी या दोन कारवींच फुलून येण जणू पुरेसं नव्हत म्हणून दक्षिणेत आढळून येणारी आणि १२ वर्षांनी फुलणारी प्रसिद्ध निलकुरुंजीही यांच्या जोडीला मोहरून आली आहे. तामिळनाडू आणि केरळ मध्ये पसरलेल्या निलगिरी पर्वतरांगांवर ती फुलली आहे. आपल्या निळसर पांढऱ्या फुलांनी संपूर्ण डोंगर व्यापून टाकणाऱ्या या फुलांमुळेच या पर्वताला निलीगिरी हे नाव पडलं अस म्हणतात.
कारवी/कुरुंजीचं झाड आणि तिच्या बहरण्याचा हा अनुपम सोहळा तिथल्या मूळ जमातींच्या जीवनात मोत्यातील धाग्याप्रमाणे गुंफलेला आहे. मुन्नारचे मुथुवान आणि निलगिरीचे टोडा लोक कुरुंजीच्या फुलोऱ्याला मांगल्याचं प्रतिक मानतात. फुलं येऊन गेल्यानंतर पुन्हा बी अंकुरेपर्यंत वाळलेलं झाड तोडणं स्थानिक रूढीनुसार अमंगल मानलं जात. मुथुवान लोक कुरुंजीच्या बहरण्यानं आपलं वय मोजतात आणि कुरुंजीला प्रेम आणि प्रणयाचं प्रतिक मानतात.
कारवी ही जशी लोकप्रिय आहे तशीच ती प्राणीप्रियही आहे. याबद्दल माहिती देतांना पाचगणीचे ट्रेकिंग गाईड नामदेव यांनी सांगितले कि तिच्या खरबरीत पानांनी आणि खोडाने आपले अंग खाजवून घेण्यासाठी गवे दाट कारवीतून चालत जातात. कणकवली कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे यांनी गवे आणि हरणांना कारवीची पाने तर अस्वलांना फळे खायला आवडतात असे सांगितले. कोट्टागिरी येथील कि स्टोन फाउंडेशनच्या वनस्पतीशास्त्रज्ञ अनिता वर्गीस यांनी बहराच्या काळात मधमाश्या बारा वर्षांतून एकदाच तयार होणारं, बहुमोल अस एकलपुष्पी (युनिफ्लॉरल) कुरुंजी मध तयार करतात अशी माहिती दिली.
नाशिकच्या पर्यावरण अभ्यासक जुई पेठे यांनी कारवीबद्दल आणखी वेगळ्याप्रकारची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “बहर येऊन गेल्यानंतर वाळलेला फुलोरा सुद्धा अगदी मादक सुगंध निर्माण करतो ज्यामुळे वाळलेल्या कारवीच्या फुलांमधून चालणं देखील खूपच आनंददायी वाटतं. गुरांना ही वाळलेली फुलं खूप आवडतात. आणखी एक आश्चर्य म्हणजे स्थानिक अदिवासी जमाती याला “कैफ” म्हणतात. हा फारसी शब्द स्थानिक भाषेत कसा आला याचा अभ्यास देखील या निमित्ताने मजेशीर ठरू शकतो.”
परंतु या विलक्षण वनस्पतीचं भविष्यही एकंदरीत प्राणी आणि पर्यावरणाच्या भविष्यासारखंच संकटग्रस्त आहे. पाचगणी, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चोरला घाट, गोवा, अंबोली आणि मुन्नार येथे कारवी पर्यटनाला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या निसर्गप्रेमी सायली पलांडे-दातार यांनी याविषयी बोलतांना खालील शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या, “पर्यावरण आणि त्याचे संवर्धन समजून घेण्याची ही अद्वितीय संधी फक्त फोटो काढण्याची संधी बनून राहणार नाही याची काळजी आयोजकांनी घेणे आवश्यक आहे.”
निलगिरीमध्ये अगदी ब्रिटीशांच्या काळापासून कुरुंजीच्या अधिवासांवर चहा, देवदार, वॉटल, निलगिरी इत्यादींची लागवड केली जात आहे तसेच धरणांसारखी “विकासकामेही” तिचा अधिवास बळकावत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या मर्यादित प्रसारामुळे कारवी अधिकच असुरक्षित बनली आहे. बेंगळूरू येथील नेशनल इंस्टीट्यूट ऑफ़ एडव्हान्स स्टडीजच्या पोस्ट डॉक्टरल स्कॉलर समीरा अग्निहोत्री यांनी Ageratina adenophora सारख्या वेगाने पसरणाऱ्या विदेशी वनस्पतींनीही बिलिगिरीरंगा पर्वतांमध्ये कुरुंजीच्या अधिवासावर ताबा मिळवला असल्याचे सांगितले.
शासकीय अधिकाऱ्यांनाही या परिस्थितीची जाणीव आहे. पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव, सुनील लिमये यांनी कारवीच्या अधिवासावर लागवड करण्याची पद्धत त्यांनी बंद केली असल्याचं सांगितलं. वर्गीस यांना कारवीचं बहरणं आणि पर्यावरण बदल यांच्यात असलेल्या संबधांचा अजून फारसा अभ्यास झालेला नसल्याची खंत आहे. त्यांनी बऱ्याचदा स्थानिक लोकांच्या तोंडून गेल्या काही वर्षांत फुलोरा विरळ होत गेल्याची तक्रार ऐकली आहे.
कारवीच्या या मनमोहक फुलोऱ्याचा माणसांच्या मनावरही प्रभाव न पडता तरच नवल. कारवी महोत्सवाच्या आयोजक, मंदाकिनी माथुर यांना ही कल्पना पाचगणीतील एक ज्येष्ठ आणि हाडाचे निसर्गप्रेमी, स्व. विनायक दीक्षित यांना आदरांजली म्हणून सुचली. त्यांनीच माथुर यांना १६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा कारवीचं फुलणं दाखवलं होतं. यावेळी महोत्सवाच्या माहितीपुस्तिकेतील कारवीचं फुल आपल्या शाळेतील परिसरात फुललेलं पाहून आपल्याला कसा आश्चर्यकारकरित्या कारवीचा शोध लागला याबद्दल संजीवन शाळेतील जीवशास्त्राच्या एका शिक्षिकेनंही उत्साहानं सांगितलं.

यावेळी मी जमिनीवर पडलेली कारवीची काही फुलं माझ्या वहीत जपून ठेवण्यासाठी उचलली खरी पण मग त्या ओलसर मातीला सुवासित करणारी ती फुलं मी परत तिथंच टाकून दिली आणि २०२४ मध्ये कारवीला पुन्हा भेटण्याची इच्छा आपल्या मनात जपून ठेवायचं ठरवलं.

पियुष सक्सेरिया हे दिल्लीस्थित एक कन्सल्टंट आणि रिसर्चर आहेत. Our Tigers Return – Children’s Story Book – The Story of Panna Tiger Reserve (2009-2015) या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत.

First published in The Indian Express’s Sunday magazine EYE on 2 October 2016: http://indianexpress.com/article/lifestyle/life-style/look-the-karvi-is-flowering/

First published in Marathi Marathimati.com : http://www.marathimati.com/green/melavar-aali-karvi/

@@@@@


रविवार, १२ जून, २०१६

Where science and art flourish together!

Arjun Srivathsa
Arjun Srivathsa is a 26 years old wildlife biologist and an artist! An alumnus of the graduate program in Wildlife Biology and Conservation at the National Centre for Biological Sciences, Bengaluru, Arjun was honoured with the Young Naturalist Award by Sanctuary Asia in 2014.
He is currently doing his PhD program in Wildlife Ecology and Conservation at the University of Florida.

Here he shares with us his journey to becoming a wildlife researcher, how he blends science and art together to convey the message of conservation, key learning from his studies and lot more….  

Please tell us about your journey to wildlife studies? How did you turn to it?
The first turning point in my life was my first visit to the jungle as a 12-year old, as part of a three-day school trip to Bandipur Tiger Reserve. I was completely fascinated and from then on, every time that people asked me what I wanted to be, I would say “zoologist”. I don't think my parents fully understood this obsession. But they gave me the freedom to choose my career, rather than coax me into taking up engineering or medicine, which were mainstream career choices in the mid-2000s. During my undergraduate years, I volunteered with various conservation organizations, trying to understand what wildlife biology was all about. This was also the time that my knowledge of conservation issues in India deepened. These initial experiences were crucial, they made me realize that there’s nothing in the world that I would rather be doing. The second turning point was when I qualified for the M.Sc- Wildlife Biology and Conservation at the National Centre for Biological Sciences Following that, for 3 years now, I have been working as a carnivore biologist with Wildlife Conservation Society’s India program.
Arjun at a field survey
You have made an excellent mix of art and science in your work. How did this idea come to your mind?
Art has always been an integral part of my life. I have been drawing and painting ever since I was a child. And now, studying wildlife and making wildlife-themed artwork are two things I enjoy the most. Following my training as a scientist, one reality that struck me was that Indian wildlife biologists have been doing exceptionally high-quality scientific studies, but a major part of what they find or discover is never communicated to people. That is when I decided to put science and art together, through my initiative ‘Pocket Science India’.
Cartoon on Elephant poaching for ivory
Sketch by Arjun Srivathsa
Pocket Science India, sounds very interesting, tell us more about it 
Pocket Science India is a venture to combine wildlife science with art, to promote conservation awareness in India. The cartoons or cartoon-series are mostly information from scientific journal articles (which are either inaccessible to people or rather complicated to understand), translated into art panels. The idea is to bridge the gaps between the work Indian wildlife scientists are doing and the non-scientific audience, with a touch of humour. So far, I have successfully converted research articles on leopards, hornbills, gharials, dugongs, elephants and a suite of other species into cartoons. You can find the entire set of series on my Facebook page www.facebook.com/pocketscienceindia. In the past couple of years, my science-themed art has been very useful in communicating wildlife science to the people, raising funds for research projects and also in creating conservation awareness.
Vultures Of India
Sketch by Arjun Srivathsa
Where do you prefer to use your talent, in art forms or analyzing data?
I do both! In fact, I spend almost 90% of my time struggling with statistics, trying to analyze data and writing up scientific papers. If I could choose, then I would only do the art. But both these aspects have their own purpose. And I am happy that I currently do both.
Fishing Cat
Sketch by Arjun Srivathsa
You studied dholes, leopards, tigers and other mammals in Western Ghats, you also published a paper on leopard cats recently. What are the key learnings?
Under the mentorship of tiger biologist Dr. UllasKaranth, at the Wildlife Conservation Society-India (WCS-India)I have been working on ecology of carnivores. My first project involved a multi-scale study of dholes (wild dogs) in Karnataka’s Western Ghats. Our research discovered that dholes are found across nearly 14,000 sq.km of Karnataka’s forests in the ghats, nearly half of which are not under any national park or wildlife sanctuary. We also found that chital (spotted deer) and sambar deer were very important factors for supporting dhole populations in the landscape. Following that, my work with WCS-India’s research team has expanded to include studies of leopards, tigers, sloth bears, leopard cats, and also other aspects of wildlife research, like human impacts on forest systems.
About the leopard cat, having recognised that there is very little knowledge on small felids of Asia,​ my colleagues and I ​​estimated populations of the leopard cat in the Western Ghats. ​With poaching, habitat loss, and illegal pet trade threatening their survival, there was crucial necessity for such a study. There is need for similar assessments of leopard cat populations across their distribution range. Our study, which involved camera trap surveys across about 2000 sq. km area, identified Bhadra and Biligiri Rangaswamy Temple Tiger Reserves as potential population strongholds for the species. Within areas where they occurred, higher leopard cat densities were clustered around secondary or disturbed forests and forest coffee plantation ​​habitats. ​We also observed that their densities were high around human settlements, likely driven by presence of rodents. ​These kinds of annual surveys need to be combined with continuous population monitoring to understand leopard cats better, and ensure their long-term conservation.
by Arjun Srivathsa
You have a special relationship with the Dhole, tell us how it all began?
I chose to study dholes almost by chance for my MSc. I always liked the idea of studying carnivores, but the dhole was definitely not on my mind. But when I started reading about these social carnivores, I found them absolutely fascinating. They live in packs, they don't really bark, they are able to hunt and kill prey animals that are much bigger than themselves and most interestingly, they are able to carry out coordinated attacks in dense forests! I also realized that there is very little known about dholes in India, although India may be the country with the world’s highest dhole population. I am glad I chose to study dholes for my MSc and I definitely want to continue working on them.
Dhole (धोल)
Sketch by Arjun Srivathsa
Please share your most heartwarming experience?
There are so many memorable field experiences. In fact, every single day spent in a forest is unique and it teaches something new. But the one experience I will always treasure is seeing the full sequence of a pack of dholes hunt and kill a spotted deer near our camp in Bandipur, during my MSc field work.
Wolf
Sketch by Arjun Srivathsa
On the current talk of development in the country, what would you say?
The current government’s approach to development is wrong. They are compromising on ecological security, the loss we will incur in this process is irreversible. What happened in the United States in the 50s to 70s is happening in India today. They built mega infrastructures like dams, which they are now destroying as the water crisis is deepening. Our population scenario is very different too. We can’t just copy and paste just any model of development here.
The government is also embarking upon the “interlinking of rivers” project. This will be an even bigger disaster than the big dams. Every river has its own course according to its geographical nature. Linking perennial and seasonal rivers will disturb both ecologies that have flourished around the rivers and adapted to their conditions for a very long time.
Even solar energy, which is clean and green, is being laid on grasslands and scrublands that the government has classified as wastelands! They are not wastelands, they are very important habitats of foxes, wolves, chinkaras and many other endangered species. Destruction of this ecology will have far reaching ill effects.
The same harm is done when you construct wind mills in Western Ghats. Roads, labour colonies and other supporting infrastructure can have immense negative impacts on forests, the flora and fauna.
We may realize the disastrous consequences of all these activities after 10 or 20 years but it might be too late.
Cartoon on Dugongs
Sketch by Arjun Srivathsa
Can wildlife in India hang its hope on the young generation?
Most certainly! Compared to the 1970s and the 80s, we have so many more wildlife biologists now. There are institutions taking academic interest in the field of wildlife biology and there are also a lot more people who want to take this up as a career. But more than the young generation, I feel it is the government that needs to step-up and support long-term conservation of our wildlife and wild landscapes. It is sad that we have to fight our own government in an attempt to make our people realize the kind of ecological wealth we have in our country. It is also disheartening to see that the flawed idea of ‘development’ is making us lose something really valuable in the process.
Tiger with cubs
Sketch by Arjun Srivathsa

-Interviewed by Parikshit Suryavanshi
@@@@
Published in TBI in a different form :

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

A voice from the waste box

Ashabai Doke

Ashabai Doke is an ecofriendly entrepreneur from Aurangabad, Maharashtra. She is associated with Civic Response Team (CRT^) - an organization from the same city working in the field of solid waste management. She is also the chief organizer a union of wastepickers in Aurangabad.
She manages dry waste collection shops and provides better earnings to seven wastepicker women. Her efforts have been instrumental in improving working conditions and income of other 40 wastepickers/sanitary workers. In association with CRT and Aurangabad Municipal Corparation, she looks forward to expand her work and improve the life conditions of many more such workers. 
She was invited to Paris for the United Nations Framework Convention on Climate Change – Conference of the Parties 21 (UNFCCC CoP21) to share her experiences and thoughts however unfortunately she couldn’t go.

A wastepicker turned an entrepreneur here she shares her extraordinary life journey.

FROM A WASTE PICKER TO AN ENTREPRENEUR, PLEASE SHARE YOUR LIFE JOURNEY WITH US.
I was born in a small village, could learn only up to the 3rd standard and married off at the age of 12 years. Though I was married into a farmers’ family, the region was drought prone and agriculture was a lost cause. We moved to Aurangabad 25 years ago. Initially tried my hand on other works but couldn’t get any regular one. Finally went for picking waste with some relative women who were living nearby. I stepped into the pile of waste some 20 years ago and I am still in the same business, just slightly better placed than others.    
The scrap dealer to whom I was selling my collection had sold his shop to someone else. The new shop owner was cutting on weight saying the waste is wet and it weighs more. One day, even after the end of monsoon and the waste being dry he cut on my weight. I asked him, “Why do you do this? I won’t sell my collection to you.” He said, “You have no option, where will you sell?” I took it as a challenge. I took a piece of land on lease for Rs.2000 per month and started collecting waste material there. After a month bigger scrap dealer came to me and offered 2 to 3 rupees extra after each kilo of each scrap item (i.e. paper, cardboard, plastic bags, water bottles etc). Thus my business took off in 2010.
After a few months I fell ill. I couldn’t run the set up for the next four years. I kept paying the rent. My whole family had to adopt several austerity measures to manage this unproductive expenditure. However we did because we wanted to retain the place which otherwise could have been lost immediately. Even now the other scrap dealers try to snatch it from me. They approach the landlady and offer more rent but as the lady has greater faith in me she has not given in to them.
In January 2015, with the help of a woman relative I reopened my shop. She gave me Rs. 30,000, with this money I paid the debt of three wastepicker women and freed them from a scrap dealer. After some time, advocate Umarikar also helped with Rs.50,000 and now I have seven women selling their waste directly to me and 40 others working with me through a contractor from Waluj.
Sorting lives : around 50 wastepicker and sanitary workers sell their waste to Ashabai.
Photo : Parikshit Suryavanshi
YOU SAID YOU FREED THE WOMEN, WHAT DOES IT MEAN?
In the time of crisis like illness which is quite regular due to the unhygienic working and living conditions, marriage of a girl child etc, wastepicker women have to borrow money from the scrap dealer. He gives money on the condition that the woman will sell her collection to him only. They cheat on weight, cut on rates, however these illiterate women don’t understand it. They are trapped into a vicious cycle.
SETTING FREE A BONDED LABOUR MUST NOT BE EASY. ARE THERE ANY LEGAL ISSUES? KINDLY ELABORATE ON THIS.
Actually this is an informal transaction. There are no written documents. However a scrap dealer knows how to recover his money. For him, it is rather an investment. He uses all sorts of argument and convincing tactics to retain the wastepickers.
When I pay the debt of a wastepicker woman and free her from a scrap dealer it certainly irritates him. But they don’t argue with me as they understand it is a part of the business. However they do indulge in creating problems for me.  
Full of problems, unending debt, deception and exploitation - life of wastepickers is abysmally hopeless. Ashabai, being one of them, is trying to bring some light to their lives.
Photo – Parikshit Suryavanshi
HOW WAS YOUR DAILY ROUTINE AS A WASTEPICKER?
I would get up at half past three or four, prepare food for the entire family and leave for collection by five in the morning. Collect waste till one in the afternoon. Then come to the scrap dealer where the sorting took us at least three hours. Thus I could return home only after 12 hours at around five pm, after which I had to do household works like preparing food, cleaning vessels, washing clothes etc. I couldn’t sleep before 10 at night. Every wastepicker woman lives almost the same routine.
HOW DID YOU COME IN CONTACT WITH CRT?
I used to collect waste in Sindhi colony of Aurangabad but couldn’t go for sometime due to illness. One day I went and I saw Natasha Zarine and Gauri Mirashi of CRT, they were working on a solid waste management project there. They told me not to collect waste in that area. Their assumption was wastepickers scatter the waste. They had also appointed two wastepicker women to collect waste directly from the households however they were collecting only quality plastic that can fetch better price and leaving plastic bags behind.
I argued with Natasha and Gauri that I collect waste from this area for several years and they could not expel me like this. They agreed to let me collect in the other part of the same colony. When they saw my work they liked it. We got to know each other, and they accommodated me in their work. Now I accompany them in every new area they start a project. Usually the wastepickers don’t listen to anybody and just do what they want however when they see me as one of them and how I made my progress they are convinced. I responsibility is to teach them how to collect all dry waste material and keep the surroundings clean.
IS CRT HELPING OTHER WASTEPICKERS TOO?
Yes. CRT’s work is a great help. In Waluj, an industrial suburb of Aurangabad, CRT has implemented a solid waste management project wherein dry and wet wastes are segregated at source and collected differently. Wet waste is composted and dry waste is brought to my shop, the second one, started with the help of CRT. There are 40 contracted wastepickers and sanitary workers. Earlier they were given 3000 rupees per month that too not on time, now, after implementation of the project they receive Rs.6000 per month in hand and Rs.1700 towards Provident Fund. The money generated from dry waste is also distributed among them. CRT has made all these arrangements.
WHAT DO YOU WANT TO DO FOR THE WASTEPICKERS?
Quality of life of wastepickers can be improved if they get the full remuneration for their waste collection. This is possible if their debts are paid and they are freed from the clutches of the fraud scrap dealers. For this, I will have to expand my business and pay their debts. There are seven to eight thousand wastepickers in the city I want to set free as many as possible.
If I receive financial help from an organisation or an individual and if I can free at least 50 women my work will start. Loan taken for paying their debt can be paid in a year and more women can be released.
I need a piece of land to expand my business. There are many such unused sites belonging to the corporation of Aurangabad. If corporation gives me one such piece of land to operate it can help in the welfare of the wastepickers.
Ashabai’s emphasis is on expanding her own business and thereby uplifting her wastepicker sisters by involving them into it.
 Photo – Parikshit Suryavanshi
WHAT ARE YOUR EXPECTATIONS FROM THE GOVERNMENT AND THE SOCIETY?
I request from the depth of my heart to the government to ban the sale of liquor. At every nook and corner of a slum area there is a liquor shop. The children of poor are easily getting addicted. Husbands harass their wives, take away their hard earned money and waste it on drinking. It has destroyed and is destroying innumerable poor families. Stern steps must be taken to stop this havoc.  
Second thing, we don’t want our children to be wastepickers. They must be educated. Life conditions of wastepickers are so bad that they can’t even think of educating their children. The abject poverty bound their children to accompany them to the field. Thus they are thrown into this business from their very childhood.
The dirty look of some people towards a wastepicker woman and false allegations of theft are also important concerns.
Frequent illness is also a major cause of misery. People throw unhygienic waste into the garbage. It hurts them. Such wastes should be disposed of in a scientific manner. Government should provide free and quality health services to this lowest stratum of the society.
Government needs to do a proper survey of wastepickers in the city. Today fake wastepickers usurp benefits of the government schemes meant for wastepickers.
KINDLY TELL US SOME OF THE MOST MEMORABLE INCIDENTS FROM YOUR LIFE?
Once an eighteen year old boy attempted to rape a seven year old girl of a wastepicker woman. Her parents went to the police station. The authorities, instead of filing an FIR took their complaint on a blank paper. They made no enquiries and no arrests. When I came to know of the incident I gathered some women and went them to the police station. We insisted that the FIR should be registered and the boy must be arrested. If he is absconding his parents must be arrested or else we will sit on “Dharana”. The police then agreed to our demands and arrested the boy. Now the case is going on in the court. The girl’s parent felt intimidated and thought of leaving the place but we assured them that our organization will stand behind them. They felt secure with this support.
In another incident a wastepicker sister died in a blast that took place in a waste pile. No attention was paid by government in this matter. We, through our organization went to see the collector and got an aid of Rs.30,000 for her family. I feel sad that we could do only this little for her and the culprits remained unpunished.
Some people make false allegations of thievery on wastepickers. The organization immediately intervenes and the false allegations are taken back which otherwise could turn into lot of harassment. Such is the pressure of the organization.
All these memories are painful as well as satisfying. Painful because I see my wastepicker sisters suffering a lot and satisfying in the sense that I could at least do something for them.
HOW WERE YOU INVITED TO UNFCCC CoP21 AT PARIS? WHY YOU COULDN’T GO? HOW DID YOU FEEL?
Natasha Zarine of CRT gave a presentation at a conference organized by Alliance of Indian Wastepickers (AIW) in Hyderabad. There she told my story of becoming an entrepreneur from a wastepicker. The AIW people were quite impressed. They applied to UNFCCC CoP21 through Indian Youth Climate Network (IYCC) for my participation. Thus I was selected and invited to talk on my life struggle, sustainable and equitable solid waste management solutions and a cleaner, better and equitable world for all.
I couldn’t get my visa to go to Paris. Its reasons are yet unknown to me. However we tried our best till the last moment. We were greatly shocked due to the cancellation of my journey. We felt sorry. I was to represent the people who are most affected by climate change. Sadly I couldn’t take their voice to the world.
Parikshit Suryavanshi

suryavanshipd@gmail.com
@@@@

First published in The Hindu's Bussiness Line Ink :


गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

सफर शहरी बिबट्यांच्या अद्भुत जगात


बऱ्याच वर्षांपासून निकीतला हा फोटो घ्यायचा होता. अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर हा फोटो ‘मुंबईचा बिबट्या’ म्हणून खूप प्रसिद्ध झाला. आपल्या मजबूत शरीरामुळे या बिबट्याला ‘बिग डेडी’ हे नाव मिळाले. फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
एक होतकरू तरुण वन्यजीव संशोधक, निकीत सुर्वे हा वाईल्डलाईफ इंस्टीट्युट ऑफ इंडिया, देहरादून या मानांकित संस्थेचा पदव्युत्तर पदवीचा विध्यार्थी आहे. 
निकीत सुर्वे, एक मुंबईकर तरुण, वाईल्डलाईफ इंस्टीट्युट ऑफ इंडिया या संस्थेत पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून निकीतने नुकतेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर एक संशोधन केले. आपल्या विविध वैशिष्ट्यांमुळे हे संशोधन प्रसार माध्यमांमध्ये बरेच गाजले. हा प्रकल्प वनविभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने पार पडला. या प्रकल्पाचे अभ्यासक्षेत्र जवळपास १४० वर्ग किमी इतके होते ज्यात आरे कॉलोनीसह उद्यान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा समावेश होता. या क्षेत्रात एकूण ३५ बिबटे आढळून आले.
उद्यानात बिबट्याच्या वन्य भक्ष्यांचे आणि उद्यानाच्या परिघावरील भागात कुत्र्यांचे प्रमाणही भरपूर आढळून आले.
बिबट्यांच्या विष्टेच्या अभ्यासातून असे आढळून आले कि संजय गांधी उद्यानातील बिबट्यांच्या आहारात वन्य तसेच पाळीव अशा दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचा समावेश आहे. जर त्यांच्या भक्ष्यांची संख्या (वन्य आणि पाळीव दोन्ही) पुरेशी असेल आणि त्यांचा अधिवास सुरक्षित असेल तर बिबटे  मुंबईसारख्या शहरी भागातही माणसांसोबत राहू शकतात. या अभ्यासाच्या काळात मानवी वस्तीत येऊनही बिबट्यांकडून माणसांवर एकही हल्ला झाला नाही.
चला तर जाणून घेऊयात निकीत सुर्वे यांच्याकडून या प्रकल्पावर काम करतांना त्यांना आलेले अनुभव, माणसांनी भरलेल्या मुंबईतील बिबट्यांची जीवनपद्धती आणि आणखीही बरेच काही.
उद्यान परिघावरील भागातील एक भटके कुत्रे. बिबट्याच्या आहारात वन्य भक्ष्यांचा वाटा ५७% असून पाळीव प्राण्यांचा ४३% आहे. एकट्या कुत्र्यांचा वाटा २४.४६% इतका आहे*. 
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
तुम्ही वन्यजीव अभ्यासाकडे कसे काय वळलात?
पक्षी आणि प्राण्यांची मला लहानपणापासून आवड होती. चिमण्या पाहण्यात आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांशी खेळण्यात मी रमत असे. सुट्ट्यांमध्ये प्राणीसंग्रहालयात जाणे एक पर्वणी असायची जिची मी आतुरतेने वाट पाहत असे. लहानपणी माझी आई, माझे इतर नातेवाईक आणि नंतर शाळा-कॉलेजातील माझे शिक्षक सर्वांनीच मला या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शक मिळत गेले हे मी माझे सुदैव समजतो.
या प्रकल्पाच्या निमित्ताने वन विभागासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता?
हा एक संयुक्त प्रकल्प होता ज्यात वन विभागाचा बरोबरीचा सहभाग होता. यात सुरुवातीला आम्ही बऱ्याच कार्यशाळा घेतल्या ज्यात मी बीट गार्डसना लाईन ट्रान्झेक्ट, कॅमेरा ट्रेपिंग, कॅमेरा कसा लावावा, सुरु कसा करावा, बंद कसा करावा इत्यादी बाबींचे प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष काम करतांना वन विभागाचे कर्मचारी नेहमीच माझ्यासोबत असायचे. एकावेळी आम्ही १०-१५ कॅमेरे लावत असू. एका कॅमेरा ट्रॅपची जबाबदारी एका बीट गार्डकडे दिली जात असे. मी सकाळी एखाद्या बीट गार्डसोबत तर संध्याकाळी दुसऱ्यासोबत कॅमेरे लावलेल्या जागांची पाहणी करत असे जेणेकरून त्यांना आपण एकटेच काम करत आहोत असे वाटू नये. वन विभागातील कर्मचाऱ्यांसोबत काम करतांना मला खूप काही शिकायला मिळाले. याचबरोबर या प्रकल्पात मला मोलाची साथ दिली ती वन मजूरांनी, वन मजूर म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काम करणारी माणसे. पण खर सांगतो यांच्या अनुभवजन्य ज्ञानाला तोड नाही. त्यांनी मला आपल्यातलाच एक मानले आणि त्यांना असलेली सर्व माहिती माझ्याशी मनापासून शेअर केली याबद्दल मी त्यांचे आभार मानले तितके थोडे आहेत. दिवसभर जंगलात फिरून थकून गेल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्या हातची भाजी-भाकरी खाण्यातला आनंद केवळ अवर्णनीयच होता.
कॅमेरा ट्रॅप बसवणे हे जिकीरीचे काम असते. निकीतला या कामात बरीच मदत घ्यावी लागली.
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
एकीकडे असं म्हटलं जात कि बिबट्या हा लाजाळू प्राणी आहे आणि तो माणसांना टाळतो आणि दुसरीकडे असं आढळून येत कि तो शिकार करायला (कुत्र्यांची) मानवी वस्तीत येतो, असं का?    
बिबट्या माणसांना टाळत नाही तो माणसांच्या दृष्टीस येणं टाळतो. बाहेर पडून माणसांच्या नजरेस न पडता आपल काम (शिकार) करण्याची योग्य वेळ कोणती हे त्याला बरोबर कळतं. बिबटे मानवाच्या सानिध्यात दीर्घकाळापासून राहत आलेले आहेत आणि माणसांसोबत कसे जागावे हे ते शिकले आहेत. याशिवाय तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर तसे सोपे आहे तो मानवी वस्तीत का येतो तर ‘सोप्या आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या’ भक्ष्यासाठी.  
कॅमेरा ट्रॅप्स बसवण्यासाठी योग्य जागेची निवड कशी केली जाते?
यासाठी आम्हाला अप्रत्यक्ष प्रमाणांवर अवलंबून राहावं लागतं जसे बिबट्यांची विष्टा, त्यांच्या पायांचे ठसे, स्क्रेप्स इत्यादी. प्रकल्पाच्या सुरुवातीला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आम्ही जंगलात फक्त हे पुरावे शोधण्यासठी फिरत होतो, दररोज एक किंवा दोन फॉरेस्ट बीट इतकं आम्ही चालायचो. अप्रत्यक्ष प्रमाणांएवढीच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक लोकांना बिबटे कोणते रस्ते वापरतात, कोठे पाणी पितात हे चांगलं माहिती होतं. या दोन्ही गोष्टींच्या मदतीने आम्हाला एकदा बिबट्या कोठे केमेऱ्यात येईल ही माहिती मिळाली कि आम्ही अशा जागा निवडायचो जेथून कॅमेरा सहसा चोरीला जाणार नाही.
कॅमेरा ट्रॅप बसवणे हे विशेष कौशल्याचे काम आहे. कॅमेरा ट्रॅप बसवतांना त्याची जमिनीपासूनची उंची, समोरासमोरील कॅमेऱ्यांतील कोन, प्राणी वापरात असलेले रस्ते, पाणवठे इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. 
फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
अशी मदत मिळायला तुम्हाला स्थानिक लोकांची मने जिंकावी लागली असतील?
नक्कीच, स्थानिक लोकांच्या मदतीला तर पर्यायाच नाही. बीट गार्डस आणि वन मजूर हे या प्रकल्पातील माझे साथी होते. आम्ही सोबत फिरत असू, सोबत जेवण करत असू आणि अप्रत्यक्ष प्रमाण शोधण्याच आमच कामही आम्ही सोबतच करत असू. यामुळे आमच्या संबंधात खूप आपुलकी निर्माण झाली. जेवढे बिबट्यांचे फोटो मिळाले त्यांची नावे आम्ही स्थानिक लोकांशी चर्चा करूनच ठेवली आहेत. बऱ्याचदा या बिबट्यांना ते “आपले बिबटे” म्हणून संबोधत.
बिबट्यांना नावे! अरे वाह! काही उदाहरणे द्याल?
चांदणी : चांदणीचा फोटो जिथे मिळाला त्याच्या जवळच एका आजीबाईंची झोपडी होती. माझं जंगलातलं काम संपलं कि मी तिच्या ओसरीत येऊन बसत असे आणि तिच्याशी गप्पा मारत असे. यावेळी मी तिला आम्हाला मिळालेली बिबट्यांची छायाचित्रेही दाखवत असे. गप्पांच्या ओघात एकदा ती म्हणाली कि आदिवासींमध्ये अशी एक समजूत आहे कि, “बिबटे चांदण्या रात्री बाहेर पडतात म्हणून आपण चांदण्या रात्री घराबाहेर पडू नये” (चांदणी रात्र म्हणजे ज्या रात्री चांदण्यांचा उजेड असतो चंद्राचा नाही/अमावस्या). यावरून त्या मादी बिबट्याच नाव चांदणी ठेवलं.
परिस्थितीशी जुळवून घेण्यात बिबट्या (Panthera pardus fusca) हा अत्यंत माहीर प्राणी आहे. तो प्रसंगी उंदीर, घुशीसारखे कृंतक (कुरतडणारे प्राणी) खाऊनही उदरनिर्वाह करू शकतो. 
फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
भुत्या : बिबट्यांच्या दोन्ही बाजूंचे फोटो यावेत म्हणून आम्ही थोड्या फरकाने एकमेकांसमोर दोन कॅमेरे ठेवतो. या बिबट्याचा फोटो एका कॅमेऱ्यात येत असे आणि एकात नाही! यामुळे हा झाला – भुत्या!
एसजीएनपीमधील बिबटे माणसांसोबत राहण्याची कला शिकत आहेत! सध्याच्या काळात मानव-बिबट्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर घाट झाली आहे. 
फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
मस्तीखोर : कॅमेऱ्याशी झालेल्या आपल्या पहिल्याच भेटीत या बेट्याने कॅमेरा खाली पाडला. एकमेकांसामोरील दोन केमेऱ्यातील एका केमेऱ्याने चार बिबट्यांचे फोटो घेतले कारण त्या रात्री तेथून चार बिबटे गेले होते आणि त्याच्या समोरील कॅमेऱ्याने मात्र एकच फोटो घेतला. त्यातील एकुलता एक फोटो दुसऱ्या दिवशी जवळून बघितला तेव्हा मला कळले कि हा बिबट्या त्या केमेऱ्याकडेच पाहतो आहे. यानंतर निश्चितच हा त्याच्याजवळ गेला आणि याने तो कॅमेरा खाली ओढून पाडला कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला तो जमिनीवर पडलेला आढळून आला. याच्या या मास्तीखोरीमुळे याचे नामकरण झाले – मस्तीखोर!
मस्तीखोर

पहिल्यांदा कॅमेरा पाहताच या बिबट्याने त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो खाली जमिनीवर पडून टाकला. या मास्तीखोरीमुळे याचे नाव पडले – मस्तीखोर!
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस

संजय गांधी उद्यानातील एक रानडुक्कर
 कॅमेरा फारसा न आवडणारा हा आणखी एक जण. या फोटो नंतर दुसऱ्यादिवशी संशोधक टीमला हा कॅमेरा खाली जमिनीवर पडलेला आढळून आला. या महाशयांनी तो पाडला होता.
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
प्रत्येक बिबट्या वेगळा कसा काय ओळखता येतो?
प्रत्येक बिबट्याच्या पाठीवरील ठिपक्यांची रचना वेगवेगळी आणि एकमेवाद्वितीय असते. जसे प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात. डाव्या-उजव्या हातांचे ठसे जसे वेगळे असतात तसेच बिबट्यांच्या डाव्या-उजव्या पाठीवरील ठिपकेही वेगळे असतात. आपण दोन कॅमेरे एकमेकांसमोर ठेवतो परंतु ते एकाचवेळी सुरु होऊ नयेत म्हणून त्यांच्या कोनात थोडा फरक ठेवला जातो. अशाप्रकारे आपल्याला बिबट्याच्या दोन्ही बाजूंची छायाचित्रे मिळतात. मग ही छायाचित्रे इतर सर्व छायाचित्रांशी जुळवून बघितली जातात आणि त्यातून वेगवेगळे बिबटे ओळखता येतात. यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.
बिबट्यांची ओळख
माणसाच्या बोटांच्या ठशांप्रमाणे (फिंगरप्रिंट्स) प्रत्येक बिबट्याच्या पाठीवरील ठिपक्यांची रचना एकमेवाद्वितीय असते! त्यांच्या पाठीच्या ठिपक्यांच्या रचनेवरून ओळखले गेलेले तीन वेगवेगळे बिबटे. फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात नेमके ३५ च बिबटे आहेत हे एवढ्या खात्रीने तुम्ही कसे सांगू शकता?
नेमके ३५ च असे नाही तर त्यात १ कमी किंवा १ अधिक असा हा आकडा आहे. ही गणना वैज्ञानिक पद्धतीद्वारे केली गेलेली आहे जी तिच्या तांत्रिकतेमुळे येथे समजावून सांगणे थोडे अवघड आहे. यासाठी आम्ही मार्क कॅप्चर रिकॅप्चर पद्धतीचा अवलंब केला. (Spatially Explicit Capture Recapture model). समजा, एका तळ्यात काही माशे आहेत. आपण या तळ्यात एक जाळे टाकले आणि काही माशे पकडले. त्यांच्यावर विशिष्ट खुण केली आणि परत तळ्यात सोडून दिले. परत जाळे टाकले. यावेळी आपल्या जाळ्यात काही चिन्हित आणि काही अचिन्हीत (खुणा न केलेले) माशे पकडले गेले. पुन्हा पकडले जाण्याच्या संभाव्यतेवरून (probability) आपण माशांची एकूण संख्या ठरवतो.
बिबट्यांच्या बाबतीत चिन्ह म्हणून आपण त्यांच्या एकमेवाद्वितीय ठशांच्या रचनेचा वापर करतो. कॅमेरा ट्रॅपद्वारे मिळालेल्या छायाचित्रांची तुलना करून याच पद्धतीद्वारे त्यांची संख्या ठरवली जाते. मिळालेल्या माहितीचे रुपांतर सांख्यिकीय स्वरुपात करून ती एका कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये भरली जाते. एकदा आपण सर्व माहिती त्यात भरली कि ते सॉफ्टवेअर त्या माहितीवर प्रक्रिया करून स्वतः गणना आणि माहितीचे विश्लेषण करते. अशाप्रकारे सर्व माहिती त्यात टाकल्यानंतर आम्हाला ०.५ च्या स्टेंडर्ड एररसह (मानक त्रुटी) ३५ हा आकडा मिळाला (म्हणजेच अधिक किंवा उणे ०.५). आम्हाला बिबट्यांची एकूण ८८ छायाचित्रे मिळाली.  
वाहत्या पाण्याखाली बिबट्याची विष्टा धुतांना निकीत
 बिबट्याच्या विष्टेतील न पचलेले भक्ष्यांचे केस, नखे इत्यादींचा अभ्यास करून त्याच्या आहाराचे विश्लेषण करण्यात आले. 
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
काम करतांना तुम्हाला आलेले अविस्मरणीय अनुभव आमच्याशी शेअर कराल?
बिबटा पाहायचा असं ठरवून जेव्हा कधी मी जंगलात गेलो तेव्हा मला बिबट्या कधीच दिसला नाही. मला बिबटे फक्त तीन वेळेस दिसले परंतु बिबट्यांना मात्र मी अनेकदा दिसलो हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो. याच कारण म्हणजे बिबट्याचं छालावरण (camouflage) धारण करण्यात पटाईत असणं. एकदा मी माझ्या मित्रासोबत कन्हेरी लेणीच्या वरील पठारावरून चालत जात होतो आणि आम्हाला दूरवर एक बिबट्या दिसला. दुरून तो एखाद्या छोट्या पक्ष्याएवढाच दिसत असेल, पाठीमागे मावळत्या सूर्याचे सुंदर लालसर आकाश आणि त्यावर बिबट्याची काळसर आकृती, खरंच अविस्मरणीय होते ते दृश्य! अगदी आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसेच उभे राहते.
याच प्रकल्पातील आणखी एक हृदयस्पर्शी आठवण आहे. प्रत्यक्ष जंगलात काम करतांना मला मदत करणारा माझा एक सहकारी वन मजूर हा आधी वन विभागाच्या रोपवाटिकेत काम करीत असे. प्रकल्पाच्या काळात तो पहाटे ५ वाजता कामावर येई आणि रात्री ८ वाजता घरी जाई. मी त्याला विचारले कि बाबारे तू इतके कष्ट का घेतो आहेस? तर तो म्हणाला, “मला जंगलात जायला खूप आवडते. तुमच्यासोबत काम करतांना मला ही संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे नाहीतर मी रोपवाटिकेतच राहिलो असतो.” तो विवाहित होता आणि त्याला दोन मुलेही होती. त्याचे उत्पन्न कसेतरी हातातोंडाची गाठ पडेल इतकेच होते परंतु तो भविष्याची चिंता न करता अगदी मनापासून आणि सर्वस्व झोकून देऊन काम करत असे. त्याच्याकडे पाहून मला असे वाटत असे कि लोकांना त्यांच्या आवडीचे काम करू दिल्यास ते अगदी अभूतपूर्व असे काम करून दाखवू शकतात. माझ्यासाठी तो नेहमीच एक प्रेरणास्त्रोत ठरेल.
या प्रकल्पातील तुमची आवडती छायाचित्रे आणि त्यामागील गोष्टी आमच्या वाचकांना सांगा.
अशी काही छायाचित्रे आहेत त्यातील दोनबद्दल येथे सांगतो.
बिग डेडी (मुंबईचा बिबट्या) : २०१२ मध्ये, मी ‘मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’ नावाच्या एका प्रकल्पासाठी स्वयंसेवक म्हणून काम करत होतो. यावेळी माझ्याकडे एका केमेऱ्या ट्रॅपची जबाबदारी देण्यात आली होती जो जमिनीपासून उंच जागेवर लावण्यात आला होता. या कॅमेरा ट्रॅपकडे पाहून मी नेहमी अशी कल्पना करीत असे कि कधीतरी मी असा एक फोटो मिळवीन ज्यात बिबट्या आणि त्याच्या पाठीमागे हे प्रचंड पसरलेले शहर दिसून येईल. मग माझा स्वतःचा प्रकल्प करण्याची वेळ आली तेव्हा मी अशी जागा निवडली जेथे बिबट्या येतो हे मला माहित होते आणि त्या ठिकाणी पाठीमागे शहराचे दृश्यही दिसत होते. ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि थोड्या वणव्याने त्या जागी एक खिडकीसारखी जागा तयार झाली होती जिच्या दोन्ही बाजूला वाळलेले गवत असून मधली जागा मोकळी होती. त्याठिकाणी कॅमेरा लावल्यानंतर जवळपास २-३ दिवसांनी मला माझ्या स्वप्नातील ते छायाचित्र मिळाले. यावेळी मला जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय आहे. हा फोटो आता “मुंबईचा बिबट्या’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
पिळदार स्नायूंचा हा बिबट्या अत्यंत बलवान दिसत असल्यामुळे याचे नाव आम्ही “बिग डेडी” आहे.
बिग डेडीचा हा आणखी एक फोटो. पाठीमागे मुंबईचा झगमगाट जणू संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या या अनभिषिक्त सम्राटाच्या स्वागताला सज्ज झाला आहे.  
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
उडणारा बिबट्या : काही प्राणी हे कॅमेरा शाय म्हणजेच केमेऱ्याला घाबरणारे असतात. हा त्यांच्यातलाच एक! जेव्हा हा एका केमेऱ्याजवळ गेला तेव्हा त्या केमेऱ्याने याचा फोटो घेण्यासाठी फ्लेश मारला आणि हा घाबरला. घाबरून पळत असतांना दुसऱ्या केमेऱ्याने याचा फोटो काढला ज्यात याचे तीनही पाय हवेत तरंगतांना दिसतात. हा भित्रा निघाला म्हणून याचे नाव ठेवले – भित्र्या.
उडता बिबट्या – भित्र्या 
हा एक कॅमेरा-शाय (कॅमेऱ्याला घाबरणारा) बिबटा. एका कॅमेऱ्याने याचा फोटो घेण्यासाठी फ्लेश मारला आणि हा घाबरून पाळला. म्हणून याचे नाव ठेवले – भित्र्या!
  फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
तुमचा अहवाल प्रसिद्ध झाला, या अहवालावर वन विभाग, प्रसारमाध्यमे आणि लोकांची प्रतिक्रिया कशी होती?
प्रत्येकाने या अहवालाचे स्वागत केले. या अहवालामुळे वन विभागाला विशेष आनंद झाला कारण आता भविष्यातील निरीक्षणांसाठी बिबट्यांची संख्या आणि त्यांचा आहार याबाबतीतील विश्वसनीय अशी आधारभूत माहिती उपलब्ध झाली. पूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये बिबट्यांबद्दल खुंखार, खतरनाक, नरभक्षक असे अत्यंत नकारात्मक शब्द आणि त्यांच्या जोडीला मोठ्याने गुरगुरणाऱ्या बिबट्यांचे फोटो वापरले जात असे. परंतु हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर कमीतकमी एक आठवडाभरतरी प्रसारमाध्यमांमधून बिबट्यांवर अत्यंत चांगले लेख आणि सुंदर फोटो छापून येत होते. याबद्दल खरतर मी प्रसारमाध्यमांचा आभारी आहे. या प्रकारची सकारात्मक प्रसिद्धी बिबट्यांच्या संवर्धनास अत्यंत लाभदायक आहे.
हा अहवाल एसजीएनपीच्या बिबट्यांचे संवर्धन आणि व्यवस्थापन अधिक चांगल्याप्रकारे करण्यास कशाप्रकारे मदत करील असे तुम्हाला वाटते?
एसजीएनपीमधील बिबटे आणि त्यांच्या भक्ष्यांची संख्या यांबद्दल हा अहवाल पायाभूत अशी माहिती पुरवतो. या माहितीचा भविष्यातील निरीक्षणे आणि जनसंख्येच्या तुलनेसाठी खूप उपयोग होऊ शकतो. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता, यात त्यांचे प्रशिक्षण झाले आणि त्यांनी प्रत्यक्ष काम केले. या गोष्टींचा फायदा क्षमता निर्मितीसाठी होतो. आता पुढच्या पातळीवरील अभ्यास करता येईल आणि त्यातून आपल्याला बिबट्यांच्या उद्यानातील आणि उद्यानाबाहेरील हालचालींची माहिती मिळू शकेल.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आपल्या पिल्लांसह निवांतपणे फिरतांना रान मांजर.
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
पाम सिव्हीट
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
स्मॉल इंडिअन सिव्हीट
 मुंबईसारख्या शहराच्या मध्यभागी असूनही एसजीएनपीने  अविश्वसनीय अशी जैवविविधता जपली आहे. 
 फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस
सांबर, बिबट्याच्या वन्य भक्ष्यांपैकी एक. संजय गांधी उद्यानातील याची घनता ६-८/वर्ग किमी इतकी आहे.
  फोटो : निकीत सुर्वे/एसजीएनपी/डब्ल्यूआयआय/डब्ल्यूसीएस

भविष्यात कोणत्या विषयांवर काम करण्याचा विचार आहे?
मानव-वन्यजीव यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करण्याचा आणि त्यांतील नकारात्मक आंतरक्रियांवर उपाय शोधण्याचा माझा मानस आहे. वन्यजीवांना आपल्यात सामावून घेण्यास आपण शिकले पाहिजे कारण त्यांच्यापरिने तेही खूप काही करताहेत.
                             
@@@@

*Although the frequency of occurrence of dogs was shown to be highest among all other prey species we cannot conclude about the contribution of dogs in leopard’s diet. The reason for this being, frequencies of the identifiable prey remains in the scat do not tell us about the actual proportion of prey type eaten. This is more so when the prey items vary in size to a considerable degree. Smaller prey species have more undigested material (hair) due to higher body surface to mass ratio.

The percentage contribution reported is in terms of relative biomass consumed.

Ref. ECOLOGY OF LEOPARD IN SANJAY GANDHI NATIONAL PARK, MAHARASHTRA WITH SPECIAL REFERENCE TO ITS ABUNDANCE, PREY SELECTION AND FOOD HABITS

A report by
Nikit Surve under the supervision of Dr. S. Sathyakumar, Dr. K. Sankar, Dr. Vidya Athreya


First Published in English: in The Hindu Business Line's BLink :
@@@@
    - परीक्षित सूर्यवंशी
                                            suryavanshipd@gmail.com